29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमहापालिकेचा अजब दावा; मुंबईत शिल्लक राहिले फक्त १९ खड्डे

महापालिकेचा अजब दावा; मुंबईत शिल्लक राहिले फक्त १९ खड्डे

Google News Follow

Related

पावसाळा सुरू झाल्यावर अवघ्या महिनाभरातच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसू लागले आहेत. एव्हाना मुंबईतील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. असे असले तरी महापालिकेने मात्र केवळ १९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पोर्टलच्या माध्यमातून केलेला आहे.

२२ जुलै रोजी दुपारी अडीचपर्यंत मुंबईत फक्त १९ खड्डे शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुंबईकरांकडून पालिकेच्या पोर्टलवर आलेल्या तक्रारींनुसार हा खड्ड्यांचा आकडा आहे. शहराच्या जोडीला उपनगरात अक्षरशः हजारो खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यापैकी किती बुजवले, किती खड्डे शिल्लक याची कोणतीही माहिती जाहीर केली जात नसल्याने मुंबईत नेमके खड्डे किती हे गुलदस्त्यातच राहिले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री मंत्रालयात…या बातमीसाठी शेकडो बळी जावे लागले!

तळई येथे शासनाकडून उशिराने मदतकार्य

साताऱ्यात आंबेघरमध्येही कोसळली दरड; १२ मृत्युमुखी पडल्याची भीती

तुमच्या तिजोरीची किल्ली हरवली, भ्रष्टाचार करायला ही किल्ली रात्रीच सापडते

मुंबईतील काही रस्‍ते सरकारी प्राधिकरणांच्‍या किंवा सार्वजनिक संस्‍थांच्‍या अखत्‍यारित आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने एमएमआरडीए, म्‍हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, रिलायन्स तसेच खासगी लेआऊटचा समावेश आहे. या यंत्रणांच्या हद्दीत ४५ खड्डे असून ते बुजवण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पालिकेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे.

रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही हाती फारसे काही लागत नाही. हे खड्डे बुजवले जातात पण तरीही पुन्हा खड्ड्यांची समस्या निर्माण होतेच. पालिकेकडून मागे ११ खड्डेच शिल्लक असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र प्रत्यत्रक्षात खड्ड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खड्ड्यांवरून पालिका प्रशासनावर जोरदार टीका होत असते. मिम्स बनवून प्रशासनाच्या कारभारातील फोलपणावर टीका केली जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा