नव्या रस्त्यांवर पडले १५२६ खड्डे
मुंबई आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे हा रोजचा चर्चेचा विषय आहे. शहरातील मुख्य मार्ग, अंतर्गत मार्ग आणि उड्डाणपुलांवर असलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे आढळून येतात. हमी कालावधी आणि दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. मुंबईत असे १५२६ खड्डे दुरुस्त केले असून संपूर्ण मुंबईत ४५ हजार ९२९ खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे.
कंत्राटदाराने रस्ता दुरुस्त केल्यानंतर डांबरी रस्त्यांसाठी तीन वर्षांचा आणि काँक्रीटच्या रस्त्यांसाठी पाच वर्षांचा हमी कालावधी असतो. दुरुस्तीनंतर रस्त्यांवर लगेच खड्डे पडणे अपेक्षित नसते, तरीही रस्त्यांवर मोठ्या संख्येने खड्डे पडलेले दिसून येतात. या खड्ड्यांची दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडून करून घेतली जाते. तसेच काही रस्त्यांची दुरुस्तीची कामे पावसामुळे थांबविण्यात येतात, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
अलिबागच्या कांद्याचा का झाला गौरव?
ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!
निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..
मोदी सरकारच्या काळात संरक्षण सिद्धतेला मोठे बळ
मुंबईत यंदाच्या वर्षी अशा रस्त्यांवर १५२६ खड्डे नोंदविण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी १५ दिवसांत सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार रोज एक हजार ते १२०० खड्डे बुजवले जात आहेत.
मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबई आणि उपनगरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांवर रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. दरवर्षी महापालिकेकडून रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो तरीही रस्त्यांची परिस्थिती सुधारत नाही. शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर कित्येक नागरिकांनी आपले प्राणही गमावला आहे.