25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअवघ्या ११ खड्ड्यांनी मुंबईची चाळण

अवघ्या ११ खड्ड्यांनी मुंबईची चाळण

Google News Follow

Related

पावसाळा सुरू झाल्यावर अवघ्या महिनाभरातच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसू लागले आहेत. एव्हाना मुंबईतील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. पण ती अवघ्या ११ खड्ड्यांमुळेच झाली आहे. कारण महापालिकेने मात्र केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. रविवारी पालिकेने मुंबईत केवळ ११ खड्डे शिल्लक राहिल्याची माहिती दिली होती. ४१२ खड्ड्यांपैकी २४६ खड्डे बुजविण्यात आले आहेत तर १४१ खड्डे बुजविण्याचे नियोजन करण्यात आले आहे तर १४ खड्डे बुजविण्यात येत आहेत, असे पालिकेने म्हटले आहे. त्यामुळे एकूण ११ खड्डेच शिल्लक रहिले आहेत, हे स्पष्ट होते.

खड्डे बुजवणे हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. खड्डे बुजवताना माया जमवण्यासाठी कंत्राटदार निकृष्ट प्रतीचा माल वापरून वेळ मारून नेत असल्याचे नियमितपणे दिसत असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

बाईकस्वार तर पाठदुखीमुळे ग्रस्त झाले आहेत. डांबर, सिमेंट ऐवजी मुरूम माती टाकून तात्पुरते खड्डे कसे तरी बुजवतात. विविध कारणांनी रस्ते पुन्हा खोदतात. एकूणच काय तर रस्त्यांचे काम नीट न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे. खड्डे असताना त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. अनेकदा कंत्राटदारांकडून वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. त्यामुळेच मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

मुंबईतील रस्ते दुरुस्ती म्हणजे महापालिकेचे कुरण आहे. कंत्राटदरांकडून खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी सुमारे ५० कोटींहून अधिक निधीची तरतूद केली जाते. रस्तेदुरुस्ती आणि खड्डे यांच्यावर काही हजार कोटींची उधळण होते. तरीही दरवर्षी हे काम करावे लागतेच. टक्केवारीच्या मोहापायी पालिकेने सर्वसामान्यांचे जीवन मुश्कील झाले आहे. मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालये अशा दोन्ही ठिकाणांहून खड्डे तक्रारींचे निरसन केले जात असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

सध्याच्या घडीला सर्वाधिक खड्डे मालाड : पी उत्तर ४३, चेंबूर : पश्चिम एम पश्चिम २६, अंधेरी पश्चिम : के पश्चिम २५, वांद्रे पूर्व : एच पूर्व १८, वांद्रे पश्चिम : एच पश्चिम १५, कुर्ला एल : २२, बोरीवली : आर उत्तर १९, दहिसर : आर मध्य १६, चंदनवाडी : सी ११ या भागांमध्ये आहेत. केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, नवी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका, नगरपालिका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या हद्दीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा