दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाइन असा…

दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाइन असा…

लाडका बाप्पा आता घरोघरी विराजमान झाला. बाप्पाचे दर्शन आता ऑनलाइन असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक मंडळे दर्शनासाठी सरसावली आहेत. ट्रेंडिग टॅग लागावा म्हणून आता अनेक मंडळे सरसावली आहेत. ऑनलाईन दर्शन करून देण्यासाठी मंडळांनी विविधप्रकारे नियोजन केलेले आहे.

विविध ऍप्लिकेशन्सचे व्हिडीओ कॉल्स किंवा लाइव्ह फिचर वापरून ऑनलाइन दर्शन घडवता येणार आहे. याकरता आता मंडलांनी कॅमेऱ्याची जागा निश्चित करून ठेवली आहे. एरवी तेरवी आरतीच्या झांजा आणि टाळ असणारे हात आता ट्राय-पॉड आणि त्याच्या स्टँडसह सज्ज झालेले आहेत. त्यामुळे मंडळे आता तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपला बाप्पा सर्वदूर कसा पोहोचेल याचीच तयारी करताना दिसत आहेत.

मंडळांपुढे सर्वात महत्त्वाचे आहे ते आपला बाप्पा सर्वांकडे पोहोचवा. अगदी घरबसल्या लोकांना दर्शन घेता यावे याकरता मंडळातील कार्यकर्ते मंडळात पुरेसा प्रकाश आहे की नाही म्हणजे बाप्पाचा चेहरा नीट दिसेल या गोष्टींची काळजी घेत आहेत. तसेच निश्चित केलेल्या ठिकाणापासून गणपती मूर्ती व्यवस्थित दिसेल ना याची खात्री करुन घेत आहेत. केवळ इतकेच नाही तर, व्हिडीओ कॉल्ससाठी लावलेल्या सेटअपचा गणपतीची पूजा किंवा आरती करताना अडथळा होणार नाही ना याचीही मंडळांकडून आता खबरदारी घेतली जात आहे.

गणपतीचं लाइव्ह दर्शन घडवण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील यासाठी टेक्नोसॅव्ही कार्यकर्ते आता दिवसरात्र एक करत आहेत. इन्स्टाग्रामवर खास गणेशोत्सवासाठी एक नवीन अकाऊंट बनवून मंडळे तयार झाली आहेत. म्हणजे त्या अकाऊंटने लाइव्ह जाता येईल. म्हणजेच लाइव्ह गेल्यावर फॉलोअर्सना तुम्ही लाइव्ह आहात याचं नोटिफिकेशन जातं.

फेसबुक रूम हे फेसबुकचे नवीन आलेले फिचर असून, या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांबरोबर किंवा ठरावीक लोकांबरोबर लाइव्ह व्हिडीओ करता येतो. मीटिंगची लिंक शेअर करून त्यांना या रूममध्ये ऍड करता येतं. तुम्ही तत्काळ लाइव्ह न जाता थोड्या वेळानं जाणार असाल तरीही फेसबुक रूम तयार करून ठेवता येते.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या अडसूळ यांच्या घरावर ईडीचे छापे

सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष

साकीनाक्यात ‘निर्भया’च्या पुनरावृत्तीने खळबळ

लालबागचा राजा: पोलिसांची पत्रकारांना धक्काबुक्की

विशेष म्हणजे फेसबुक अकाऊंट नसणारेसुद्धा यात सहभागी होऊ शकतात. गुगल मीटच्या माध्यमातूनही अधिकृत संकेत स्थळाचा वापर करुन आता मंडळे दर्शन देण्यासाठी सज्ज झालेली आहेत. तसेच आजच्या तरूणाईचे फेवरेट युट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंगचा वापरही आता मंडळे करत आहेत. शिवाय या लाइव्ह स्ट्रीमिंगची लिंक फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावरसुद्धा शेअर करता येणार आहे.

Exit mobile version