जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरु

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशत दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोर पोलिस आणि ३२ राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाकडून रफियााबादमध्ये शोधमोहीम सुरु आहे.

सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी अजूनही लपून बसले असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार केले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यात पोलीस व्यस्त आहेत.

याआधी शुक्रवारी लष्कराने मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाचा सूत्रधार जहीर हुसेन शाह याला अटक केली होती. अटक करण्यात आलेला जहीर हुसेन शाह हा पीओकेचा रहिवासी असून त्याला पुंछमधून ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा :

११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे देणार

बिजनौरमध्ये हिंदू मुलाला दिली धमकी

जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून २२ जण जखमी

मुंबईहून हैद्राबादला जाणारं हेलीकॉप्टर पुण्यात कोसळलं, चार जण जखमी !

 

Exit mobile version