…आणि भिकाऱ्याच्या खिशात सापडले साडेतीन लाख

गोरखपूरच्या एका भिकाऱ्याच्या खिशात साडेतीन लाख रुपये मिळाले

आजच्या जमान्यात एक भिकारी देखील मध्यमवर्गीय माणसाच्या दृष्टीने श्रीमंत आहे असे या बातमीतून आपल्याला कळणार आहे . जिथे सगळे पैसे कमावण्यासाठी धावत आहेत, तिथे गोरखपूरच्या एका भिकाऱ्याच्या खिशात साडेतीन लाख रुपये मिळाले ! विश्वास बसत नाही ना? त्याचा विडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिपराइच पोलीस स्टेशन जवळ समदार खुर्द येथे राहणारा शरीफ बौंक हा मूकबधिर आहे. त्याचे वय सुमारे ५० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. शरीफ यांचे दुसरे कुटुंब नाही, ते त्याचा पुतण्या इनायत अलीसोबत राहतो. शुक्रवारी पिपराइच पोलीस ठाण्यातील एक तरुण आपल्या साथीदारासोबत दुचाकीवरून येत होता. शरीफ याला त्या दुचाकी स्वराने धडक दिली आणि तो गंभीर जखमी झाला. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून दुचाकीस्वार तरुणाला ताब्यात घेतले, तर जखमी भिकाऱ्याला उपचारासाठी भटात रुग्णालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

 

यादरम्यान चौकीचे प्रभारी ज्योती नारायण तिवारी व इतर काही शरीफचे ओळखपत्र शोधत होते. ओळखपत्राऐवजी त्याच्या खिशातून खूप पैसे निघाले. त्याच्या खिशात एकूण तीन लाख ६४ हजार रुपये होते. भिकाऱ्याकडे एवढी रोकड पाहून पोलिसही थक्क झाले. दोन हजारच्या १६८ नोटा सापडल्या आहेत. ही रोकड तात्पुरती पोलिस ठाण्यात जमा आहे.पुढे त्याची चौकशी केली जाईल असे कळण्यात आले आहे. शरीफ यांनी पोलिसांशिवाय इतर कोणालाही पैसे देण्यास नकार दिला होता.

Exit mobile version