एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस

एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

राज्यात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सध्या अनेक ज्येष्ठांना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. मात्र एकाच लसीचे दोन डोस देण्याऐवजी दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेल्याची धक्कादायक घटना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जालना जिल्ह्यात घडली आहे.

दत्तात्रेय शामराव वाघमारे (७२) या व्यक्तीला पहिला डोस कोवॅक्सिनचा दिला गेला होता. वाघमारे हे जालना जिल्ह्यातील परतूर तालूक्यातील खांडवी गावचे रहिवासी आहेत. हा डोस त्यांनी २२ मार्च रोजी सरकारी रुग्णालयात घेतला होता. त्यानंतर त्यांना दुसरा डोस ३० एप्रिल रोजी श्रीष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला गेला. मात्र हा डोस त्यांना कोवॅक्सिन ऐवजी कोविशिल्डचा दिला गेला. त्यामुळे वाघमारे यांना काही दिवस अंगावर पुरळ उठली होती. मात्र आता आपली तब्येत उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र दोन वेगवेगळे डोस दिल्याने त्याचे काही गंभीर परिणाम तर होणार नाहीत ना, या चिंतेत त्यांचे कुटुंबिय आहेत.

हे ही वाचा:

मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली

कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

या प्रकरणात परतूर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन डॉक्टर्स सह पाच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. लाभार्थ्यांची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असताना देखील हा गोंधळ नेमका कशामुळे घडला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याबरोबच या प्रकरणाचा तपास देखील चालू केला असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version