कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाच्या उत्सवादरम्यान पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्याच्या घटनेसंदर्भात अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या होत्या याला फॉरेन्सिक तज्ञांनी एका अहवालात दुजोरा दिला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्हीमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणांच्या उपस्थितीची पुष्टी केली गेली आणि फुटेजमध्ये फेरफार करण्यात आलेला नाही असे म्हटले आहे.
या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले असून मोहम्मद शफिक नाशिपुडी असे त्याचे नाव असल्याची माहिती हवेरीचे पोलीस अधीक्षक अंशुकुमार यांनी दिली.
हेही वाचा..
१२ हजारांचा फायदा झाला म्हणून पैसे गुंतवले आणि फसला…
पवारांचे जेवणाचे आमंत्रण फडणवीसांनी नाकारले
हिमाचलच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह भाजपावर खुश
“फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात”
दरम्यान याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका व्यक्तीची चौकशी केली असून चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी कर्नाटक विधानसभेत पाकिस्तान समर्थक घोषणांशी संबंधित विधान सौधा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोहम्मद शफिक नाशिपुडी या संशयिताला बेंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलीस अधीक्षक अंशुकुमार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सय्यद नसीर हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विधानसौधा येथे आलेल्या बयादगी येथील व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने २८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी फॉरेन्सिक अहवालावर चर्चा केली आणि बैठकीदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसौधा सुरक्षा डीसीपीवर नाराजी व्यक्त केली आणि विधान सौधामध्ये इतक्या लोकांना प्रवेश का दिला असा सवाल केला. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी ‘राजभवन चलो’ मोर्चा काढला आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काँग्रेस सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तपासात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा दिल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते.