मुंबईमध्ये मागच्या काही महिन्यांपासून गोवर साथीच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तसेच संपूर्ण राज्यात गोवर रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. २०२१ च्या दरम्यान राज्यात गोवर साथीच्या रुग्णांची संख्या फक्त ९२ होती. आता २०२२ मध्ये संख्या ५०३ पर्यत पोहोचली आहे. त्याच प्रमाणात यंदाच्या वर्षात २६ टक्के जास्त प्रमाणात उद्रेक झाला आहे. मुंबई येथील साथींच्या रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये विशेष खोली तयार करण्यात आली असून त्या विभागात रुग्णांची काळजी घेतली जाते. गोवरच्या संशयास्पद रुग्णांची संख्या ६ पटीने वाढली आहे. तसेच लसीकरणाच्या कमतरतेमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जाते, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गोवर आजारामुळे सकिना उस्मान अन्सारी हिचा गुरुवारी संध्याकाळी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. तर भिवंडी येथील रहिवासी असलेल्या चिमुरडीला १३ नोव्हेंबर रोजी फुफ्फुस खराब झाल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्यांनी या चिमुरडीच्या मृत्यूचे कारण ‘ब्रॉन्कोप्न्यूमोनियासह गोवर’ आणि ‘सेप्टिक शॉक’ असे सांगितले. शहरातील इतर रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल झालेल्या मुलांची संख्या १०५ वर पोहोचली असून त्यापैकी दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच त्यापैकी जवळपास ४० मुले बरी होऊन घरी गेली आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची भेट घेतली. मुंबई महानगर पालिकेने गोवर या साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यापासून आता पर्यंत १२ हजार मुलांना या आजाराविरूद्ध लसीकरण केले आहे. तसेच “लसीकरणाच्या कमतरतेमुळे हा प्रसार झाल्याचे दिसून येते,” असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच सरकार, स्थानिक, धार्मिक प्रतिनिधी आणि समाजातील प्रमुख लोकांशी संपर्क साधून लसीकरणाच्या गरजेबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करत आहे.
हे ही वाचा :
राहुलजी आदरणीय महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का ?
वरळी कोळीवाड्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू
निवडणूक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आणि बसला दणका
सचिन वाझेला जामीन मंजूर, पण सुटका नाहीच
राज्याच्या अहवालानुसार २०२२ मध्ये मुंबईत एकूण १४ तर भिवंडीत ७ आणि मालेगावमध्ये ५ रुग्ण आढळले होते. या बैठकीमध्ये मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह उपस्थित होते, मुंबईत १६९ रुग्ण आढळली आहेत तर २ हजार ६६३ संशयित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरात ९०० हून अधिक लसीकरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. राज्याच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये तीन आणि २०२० मध्ये दोन रुग्ण आढळले होते. तसेच या वर्षी आठ मृत्यू झाले आहेत. मुंबईतील आठ संशयित मृत्यूंपैकी सात एम-पूर्व आणि एक एल वॉर्डमधील आहे. यापैकी फक्त एका बालकाला गोवरचा एकच डोस मिळाला होता.