कुनो नॅशनल पार्क मधून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे.नामिबियाचा चित्ता शौर्य मरण पावला आहे.चित्त्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्त्यूचे कारण समजेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.सकाळी ११ वाजता शौर्य चित्ता बेशुद्ध अवस्थेत निरीक्षण पथकाला दिसला.डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर त्वरित उपचार सुरु केले.त्यानंतर थोडा वेळ त्याच्यात सुधारणा दिसू लागली परंतु ३.१७ वाजता त्याचे निधन झाले.
नुकतेच काही दिवसांपूर्वी चित्ता आशा मादीने तीन पिलांना जन्म दिला होता.कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन शावकांचा जन्म झाल्याने वनअधिकारी आणि प्राणी प्रेमींमध्ये आनंदाचे वातारण निर्माण झाले होते.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी तीन शावकांचा जन्म झाल्याने हे प्रोजेक्ट चित्ताचे मोठे यश असल्याचे म्हटले होते. परंतु, चित्ता शौर्यच्या मृत्यूने पुन्हा हळहळ व्यक्त केली जात आहे.याआधी मार्च २०२३ मध्येही मादी चित्तेने चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील तिघांचा काही महिन्यांतच मृत्यू झाला.
हे ही वाचा:
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!
इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी
प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले. आतापर्यंत १० चित्ते मरण पावले आहेत.त्यानंतर आता पार्कमध्ये एकूण १४ चित्ते आहेत.
कुनो नॅशनल पार्कच्या खुल्या जंगलात चार चित्ते आहेत. यामध्ये एक मादी चित्ता वीरा आणि तीन नर चित्ता अग्नि, वायु आणि पवन चित्ता यांचा समावेश आहे. यापैकी अग्नी आणि पवन नावाचे चित्ते कुनो नॅशनल पार्कच्या बाहेरील बफर झोनमध्ये आणि आसपासच्या गावांमध्ये फिरताना आढळले. हे पुन्हा कुनोच्या हद्दीत आणले गेले. यापूर्वी २०२३ च्या उन्हाळ्यात चित्त्यांना खुल्या जंगलात सोडण्यात आले होते. त्यानंतर संसर्गामुळे चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व चित्ते पुन्हा बंदीस्त जंगलात आणण्यात आले.