बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

मुंबई गुन्हे शाखेने रविवारी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अकोला येथून गुजरातमधील रहिवाशाला अटक केली आहे. या प्रकरणात ही २५ वी अटक आहे. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील पेटलाद येथील रहिवासी असलेल्या सलमानभाई इक्बालभाई वोहरा याला अकोल्यातील बाळापूर येथून अटक करण्यात आली, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेतील निर्मलनगर भागात आमदार मुलगा जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या वोहराने या वर्षी मे महिन्यात बँक खाते उघडले होते. त्याला अटक आरोपी गुरमेल सिंग, रूपेश मोहोळ आणि हरीशकुमार यांचा भाऊ नरेशकुमार सिंग यांना आर्थिक मदत केली होती. त्याने गुन्ह्याशी संबंधित इतरांनाही मदत केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा..

केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

मोदी म्हणाले म्हणून, १२ वर्षानंतर राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली!

पत्रकार हे मालकांचे गुलाम, राहुल गांधी यांनी पत्रकारांना दाखवली जागा

सायबर क्राईम टोळीचा पर्दाफाश

हरियाणातील गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी धर्मराज कश्यप यांना हत्येनंतर लगेचच घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील बहराइच येथून कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला अटक केल्यावर पोलिसांना नुकतेच या प्रकरणात मोठा यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ ऑक्टोबरपासून फरार असलेल्या गौतमला नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आले.

Exit mobile version