25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषचार मजली कार पार्किंग कोसळले, मोटारींचा एकमेकांवर ढीग

चार मजली कार पार्किंग कोसळले, मोटारींचा एकमेकांवर ढीग

दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सात जखमी झाल्याची भीती

Google News Follow

Related

अमेरिकेतल्या मॅनहटनमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. बहुमजली कार  पार्किंग कोसळून झालेल्या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. पार्किंग कोसळतच त्या मजल्यावरच्या सर्व मोटारी एकामागून एक पडत गेल्या. या अचानक झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी घबराट पसरली. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सात जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही दुर्घटना मॅनहटनमधील ५७ एन स्ट्रीटवर नासाऊ स्ट्रीट आणि विल्यम स्ट्रीट दरम्यान घडली. चार मजली इमारत खचल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार पार्किंगचे छत कोसळले आणि या मजल्यावरील सर्व मोटारी घसरत खाली आल्या. सोबतच पार्किंगमधील लिफ्टही घसरली. त्यामध्ये अनेक जण अडकून पडले. घटनास्थळी पोलिसांच्या पथकाने धाव घेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या इमारतीमध्ये निवासी आणि व्यावसायिक आस्थापना आहेत. ही घटना घडली तेव्हा काहीतरी विचित्र घडत असल्याचे जाणवले. अचानक कंपने सुरू झाली . पार्किंग गॅरेज धक्क्याने खाली पडले असे जखमींनी सांगितले. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या लोकांना परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी रोबोट कुत्रा आणि ड्रोनचा वापर न्यूयॉर्कच्या अग्निशमन विभागाने केला आहे.

हे ही वाचा:

राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’

हे बहुमजली पार्किंग सिटी हॉल आणि ब्रुकलिन ब्रिजपासून काही इमारतींच्या अंतरावर आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजपासून अर्धा मैलअंतरावर आहे. सायंकाळी चारच्या सुमारास गॅरेज अचानक कोसळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, न्यू यॉर्क सिटी इमारत विभागाच्या नोंदीनुसार ही तीन मजली इमारत किमान १९२० पासून गॅरेज म्हणून वापरात आहे आणि नवीन बांधकामासाठी कोणतीही परवानगी अलीकडे देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत तीन मजली इमारत नोंदीमध्ये मध्ये ४ मजली कशी झाली, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

सर्व कर कार एकावर एक पडल्या असून बचावकार्य सुरू आहे. इमारतीची रचना अत्यंत कमकुवत होती. जखमी आणि मृतांचा आलेख वाढू शकतो, असे त्याच वेळी, न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाने एका निवेदनात म्हटले आहे .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा