मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर आता तानसा तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. दोन्ही तलाव संपूर्णपणे भरले गेल्यामुळे पाणी टंचाईपासून मुंबईकराना दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात मुंबई राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहराला प्रामुख्याने ७ तलावांमधून पाण्याचा पुरवठा हातो. या पैकी दोन तलाव आता पूर्ण पणे भरलेले आहेत.
मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात साततत्याने पावसाची संततधार सुरू असल्याने जलाशयांच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६,३ कोटी लीटर इतकी आहे. तलावातील जलाशयातील पाण्याच्या साठ्याचा आढावा घेता गेल्या वर्षात म्हणजे २२ जुलै २०२१ रोजी सकाळी ५.४८ वाजता तर त्या आधीच्या वर्षात २० ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ७.०५ वाजता संपूर्ण भरून वाहू लागला होता. तानसा तलावाची सुमारे १ लाख ४५ हजार ८० दशलक्ष लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे.
हे ही वाचा:
पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास
संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका
‘द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील’
मोडक-सागर तलाव हा बुधवारी दुपारी १. ४ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यानुसार सात तलावांपैकी मोडक-सागर हा भरुन ओसंडून वाहू लागलेला यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला. मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी २२ जुलै रोजी मध्यरात्री ३. २४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षात १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता, २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.
तलाव पाणीसाठा (दशलक्ष ली.) टक्केवारी
मध्य वैतरणा १,२२,५६९ ५३.९८
मोडकसागर १,२८,९२५ १००
तानसा १,४५,०८० १००
मध्य वैतरणा १,२५,२९६ ६४.७४
भातसा ४,२५,९१४ ५९.४०
विहार १६,४९७ ५९.५६
तुळशी ७,३५१ ९१.३७
एकूण ९,५२,५५० ६७