रोमच्या दक्षिणेस लॅटिनामध्ये भारतीय कामगार सतनाम सिंग (३१) याचा हात शेतीच्या एका यंत्रात सापडल्याने कापला गेला त्यानंतर तो वैद्यकीय मदतीशिवाय रस्त्यावर पडला परिणामी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी इटालियन पोलिसांनी एका कृषी कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. सिंग याच्या मृत्युनंतर तेथील भारतीयांनी या घटनेचा निषेध केला आहे.
या अटकेसाठी इटलीच्या पोलिसांना पंधरवड्याचा कालावधी लागला. सिंह यांचा १७ जून रोजी इटलीतील फार्मवर अपघात झाला आणि दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सिंग यांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याच्या संशयावरून इटालियन पोलिसांनी कथित गँगमास्टर अँटोनेलो लोवाटो याला अटक केली, अशी माहिती इटालियन वृत्तसंस्था एएनएसएने दिली.
पत्नीसह इटलीला गेलेला सिंग गवत कापत असताना मशीनमध्ये त्यांचा हात सापडल्याने तो तुटला. त्याच्या मालकांनी त्याला ट्रकमध्ये बसवले आणि त्याच्या तोडलेल्या हातासह त्याला त्यांच्या घराजवळ एखादी कचऱ्याची पिशवी टाकावी असे टाकून दिले होते.
हेही वाचा..
“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”
भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत
पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर
अमरनाथ यात्रेकरूंसाठी लष्कराचे जवान बनले देवदूत; ब्रेक फेल झालेल्या बसला थांबवण्यात यश
लोव्हाटोने कथितरित्या सिंग आणि त्यांच्या पत्नीला तत्काळ वैद्यकीय मदत न घेता रस्त्याच्या कडेला सोडले. सिंग यांना अखेर रोमच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सिंग यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली असती तर ते वाचू शकले असते असे सरकारी वकिलांचे मत आहे. या घटनेने इटलीतील गँगमास्टरिंग आणि स्थलांतरित मजुरांच्या शोषणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
लॅजिओ इंडियन कम्युनिटीचे अध्यक्ष गुरुमुख सिंग यांनी सिंग यांना मदत न दिल्याबद्दल संताप व्यक्त केला. लोव्हॅटोने सर्वात वाईट गोष्ट केली की त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्या घराबाहेर सोडले. २६ जून रोजी भारताने इटलीला सतनाम सिंगच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर त्वरीत कारवाई करण्याची विनंती केली होती.
सचिव मुक्तेश परदेशी यांनी इटलीतील भारतीय दूतावासाने एक्सवर एका पोस्ट केल्यानुसार, इटालियन नागरिकांचे परदेशात आणि स्थलांतर धोरणांचे महासंचालक लुइगी मारिया विग्नाली यांच्याकडे सिंग यांच्या मृत्यूबद्दल भारताची “गहिरी चिंता” व्यक्त केली.