दहा ते १७ वयोगटातील व्यसनाधीन मुलांचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ज्यामध्ये देशात दहा ते १७ वर्षे वयोगटातील एक कोटीहून अधिक मुलांना विविध प्रकारचे व्यसन आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने दहा ते १७ वयोगटातील व्यसनाधीन मुलांचा अहवाल सर्वोच्च न्यायलायकडे दिला आहे. या अहवालानुसार, भारतीयांकडून नशेसाठी अल्कोहोल हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्या खालोखाल गांजा-भांग व अफू वापरली जाते. सुमारे १६ कोटी नागरिक मद्याद्वारे अल्कोहोलचे सेवन करतात. तर पाच कोटी सात लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलच्या आहारी गेले आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तीन कोटी एक लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेले अमली पदार्थाचे व्यसन करतात. त्यापैकी सुमारे २५ लाख व्यक्तींच्या तब्येतीवर या व्यसनाचे दुष्परिणाम होतात. सुमारे दोन कोटी २६ लाख नागरिक अफूचे सेवन करतात. त्यामुळे झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे ७७ लाखांना वैद्यकीय मदतीची गरज भासते.
हे ही वाचा:
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
धक्कादायक बाब म्हणजे, दहा ते १७ वयोगटातील एक कोटी ५८ लाख मुलांना विविध प्रकारचे व्यसन आहे. एकूण लोकसंख्येपैकी १४.६ टक्के दहा ते ७५ वयोगटातील नागरिक मद्यप्राशन करतात. १६ कोटी नागरिक मद्याचे सेवन करतात. तर महिल्यांच्या तुलनेत पुरुष अधिक मद्यसेवन करतात. देशातील छत्तीसगढ, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वाधिक मद्यप्राशन केले जाते.