तेलंगणामधील वारंगल शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ८ वर्षाच्या मुलाच्या घश्यात चॉकलेट अडकून त्याचा मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.
वारंगलमधील राहणारा संदीप हा रोजच्या प्रमाणे शाळेत जायला निघाला. त्याचे वडील त्याला दर रोज शाळेत सोडायला जायचे. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना त्यांनी एक चॉकलेट तोंडात टाकले. त्याला ते चॉकलेट त्याच्या वडिलांनी दिले होते. कंगनसिंग सिंग असे त्याच्या वडिलांचे नाव होते. नुकतेच ते ऑस्ट्रेलियाला काम निमित्त गेले होते. तिथूनच त्यांनी त्यांच्या तीन मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकाराची चॉकलेटं आणली होती . सकाळी तिन्ही मुलांचा मूड चांगला करायच्या हेतूने त्यांच्या आईने त्यांना ही चॉकलेटं दिली. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याला कससंच व्हायला लागले. तरीही तो जाऊन वर्गात बसला. थोड्याच वेळाने दम लागल्यामुळे संदीप दगावला आणि बाकावरून खाली पडला .
हे ही वाचा:
अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले
उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळला
हे कृत्य झाल्यावर शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी अध्यापकांना ह्याची सूचना दिली. कर्मचाऱ्यांनी संदीपला ताबडतोब एमजीएम रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याचा वडिलांना फोन करण्यात आला. काही क्षणात तेही तिथे पोहोचले. डॉक्टरांना त्याच्या घश्यात चॉकलेट अडकल्याचे कळले. वेळ ना घालवता त्यांनी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. पण त्या मुलाचा गुदमरल्यामुळे तिथेच मृत्यू झाला. एका चॉकलेटमुळे त्यांच्या मुलाचा जीव जाईल हे त्याचा आई-वडिलांसाठी समजण्या पलीकडचे होते. ह्या बातमीमुळे त्याच्या परिसरात शोककळा पसरली.