एप्रिल महिन्यात भारतीय रेल्वेला १६८ वर्षे पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १८५३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (तेव्हाचे बोरिबंदर) ते ठाणे अशी पहिली गाडी धावली. या ऐतिहासिक घटनेनिमित्त एक ऐतिहासिक वाफेचे इंजिन आणण्यात आले आहे.
ठाणे स्थानकाला यामुळे एक ऐतिहासिक ठेवा मिळणार आहे. ठाण्यातील प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या फेरीतून ४०० लोकांनी प्रवास केला होता. त्यावेळेला ३४ किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेला सव्वा तास लागला होता.
हे ही वाचा:
नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर निकाल ५ एप्रिल रोजी
भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध
बुधवारी हे इंजिन ठाणे येथे स्टेशनच्या बाहेरील वाहनतळाच्या जवळ स्थापन करण्यासाठी आणण्यात आले. इतके दिवस हे इंजिन इतर इंजिनांच्या किंवा इतर ऐतिहासिक मुल्य असलेल्या वस्तूंसोबत उभे केले होते. या इंजिनाला ट्रकवर लादून ३१ मार्च रोजीच ठाण्यात आणण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज गल्ली येथे असलेल्या या इंजिनाला हिरव्या आणि काळ्या रंगात रंगवले गेले. या इंजिनाला ब्रिटिशांच्या काळातल्या सारखे तयार केले गेले. आता या इंजिनाला त्याच्यासाठी खास तयार केलेल्या स्वतंत्र चौथऱ्यावर ठेवण्यात आले आहे. अनेक रेल्वे प्रवाशांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.