सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

त्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने बंद केली. या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेले हे यश खूप मोठे.

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. सोमवारी पुन्हा एकदा राज्यात तीस हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी राज्यातील २०,८५४ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. पण राज्यातील १०२ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३,३६,५८४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

राजधानी मुंबईनेही सोमावरी पुन्हा एकदा चोवीस तासांत रुग्णवाढीचा पाच हजार हा आकडा पार केला आहे. मुंबईत सोमवारी ५८९० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या आकड्यासोबतच मुंबईतील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा हा ४६,२४८ इतका झाला आहे.

हे ही वाचा:

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नांदेडमध्ये शीख तरूणांकडून पोलिसांवरच हल्ला

आजच्या घडीला भारतातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अंदाजे साठ टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागत आहे तर जागत महाराष्ट्र चौथा आहे. देशातल्या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत.

महाराष्ट्राच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नागरिक हे नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत राज्यातील परिस्थिती आणखीनच चिंताजनक होऊ शकते अशावेळी प्रशासनाने लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजनासाठी सुरुवात करावी असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड टास्क फोर्स आणि राज्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यातील जनता नियम पाळत नसून यामुळेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. हे असेच चालू राहिले तर राज्यात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध आणावे लागतील असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Exit mobile version