भांडूप मधील ड्रीम्स मॉलला काल रात्री मध्यरात्री आग लागली होती. ही आग आज सकाळी पुन्हा भडकली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे २३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या ठिकाणी कोविड-१९चे रुग्णालय स्थापन करण्यात आले होते. या आगीत दोन जणांचा मृत्यु झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
बांग्लादेशातून आले, केरळचे मतदार झाले
कोणाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या अहवालावर कारवाई केली नाही? – आ.अतुल भातखळकर
परमबीर यांनी दाखल केली उच्च नायायालयात याचिका
मुंबई महानगरपालिकेने यापुर्वी काही मॉल्सना अग्निरोधक यंत्रणा सक्षम नसल्याची नोटिस पाठवली होती. त्यामध्ये ड्रीम्स मॉलचा देखील समावेश होता. हा मॉल काही काळ बंद देखील होता. त्याबरोबरच या मॉलला ओसी देखील देण्यात आलेली नव्हती, मात्र असे असताना देखील त्याठिकाणी कोविड रुग्णालय कसे स्थापन करण्यात आले? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. त्याबरोबरच या आगीसाठी नेमके जबाबदार कोण? असा सवालही उचलला जात आहे.
सनराईज कोविड रुग्णालय प्रशासनाकडून मात्र हे मृत्यु कोविडमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर हे मृत्यु आगीत गुदमरून झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर त्याचा धूर हॉस्पिटल पर्यंत पोहोचला, आणि हॉस्पिटलमधील फायर अलार्म वाजू लागल्याने सर्व रुग्णांना तात्काळ बाहेर काढायला सुरूवात केली. त्यामुळे सर्व रुग्णांना वेळीच बाहेर काढण्यात आले असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्व रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले.