30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्टपासून राज्यात ‘हर घर तिरंगा मोहिम’ राबविणार

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्टपासून राज्यात ‘हर घर तिरंगा मोहिम’ राबविणार

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १२ महत्त्वाचे निर्णय

Google News Follow

Related

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. बुधवार, ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

या मंत्रिमंडळ बैठकीत १२ विविध निर्णय घेण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. झाडं तोडल्यास यापुढे ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. तसेच, स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा मोहिम’ राबविण्यात येणार आहे. त्यासाठीही, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्तालयातील १९० कर्मचारी मायदेशी परतले

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  1. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्त्वाकांक्षी वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार
  2. आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता
  3. लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता
  4. आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
  5. अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
  6. विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपयांचा दंड
  7. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
  8. कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
  9. न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा
  10. सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट
  11. जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला अर्थसहाय्य
  12. ९ ऑगस्टपासून राज्यात ‘हर घर तिरंगा अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबविणार; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा