योग दिनानिमित्त ७५ हजार तरुण करणार योगासने

योग दिनानिमित्त ७५ हजार तरुण करणार योगासने

The participants performing Yoga on the occasion of International Yoga Day, in New Delhi on June 21, 2015.

दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येत्या २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील ७५ हजारहून अधिक तरुण योगासने करणार असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दिली आहे.

भारत यावर्षी स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. रोज योगासन करुन तरुण निरोगी राहू शकतात असे मुरुगन यांनी सांगितलं. तसेच येत्या २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील ७५ हजार हून अधिक तरुण योगासने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील ७५ प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील ७५ प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या ‘झिरो माईल्स’च्या नागपूरचीही निवड झाली आहे.

हे ही वाचा:

काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळं संयुक्त राष्ट्रांनी २१ डिसेंबर २०१४ रोजी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या वर्षापासून अगदी जगभरात योग दिन साजरा केला जातो.

Exit mobile version