स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग संपन्न झाला.दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शनिवारी (२५ फेब्रुवारी) रोजी नाटकाचं पहिला प्रयोग सादर करण्यात आला.स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित आणि अनंत वसंत पणशीकर निर्मित हे नाटक महाराष्ट्र शासन आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दुर्मिळ नाटक जतन आणि संवर्धन योजना २०२३-२४ अंतर्गत संग्रहित करण्यासाठी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाची निवड करण्यात आली आहे.
पानीपतच्या दुसऱ्या लढाईत मराठ्यांनी अब्दाली सेनेचा पराभव केला आणि पानीपतच्या पहिल्या लढाईच्या हारचा बदला घेतला.या वीर गाथेची कहाणी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकात रंगवण्यात आली आहे.नाटकाच्या प्रदर्शनानंतर निर्माता अनंत वसंत पणशीकर म्हणाले की, नाट्य संपदा कला मंचाने या नाटकात उत्साहपूर्ण भाग घेतला आहे.पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दुर्मिळ नाटक जतन करण्याचा उपक्रमात या नाटकाची निवड झाली.महाराष्ट्र शासनातर्फे १२ फेब्रुवारी रोजी संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाचं रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.हे नाटक कायमस्वरूपी युट्युबवर असल्याने रसिकांना पाहता येणार असल्याचे ते म्हणाले.यामुळे त्यानी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, २५ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातच ‘माझी जन्मठेप’ या नाटकाचा शुभारंभ झाला होता.’संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक वीर सावरकर यांनी लिहिले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकात आम्ही दीड-दोन महिने तालीम केली आहे.त्यामुळे या नाटकाचा शुभारंभ याच ठिकाणी झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे.नाटकातील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक डॉ.अनिल बांदिवडेकर,सुहास सावरकर, संगीत दिग्दर्शक मयुरेश माळगावकर,नेपथ्यकार आणि म.टा.सन्मान नामांकनप्राप्त सचिन गावकर, महाराष्ट्र शासन, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे समन्वयक शुभंकर करंडे या सर्वांचे कौतुक आणि केदार बापट, रामदास भटकळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी त्यांचा वेळ देऊन नाटक पाहिल्याबद्ल त्यांचे आभार मानले.
हे ही वाचा:
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
मनोज जरांगेंची माघार; आमरण उपोषण घेतले मागे
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग करण्याचे आवाहन
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे अभिनंदन केले.ते म्हणाले की, ‘संगीत उत्तरक्रिया’ हे नाटक रंगभूमीवर येणं गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये सावरकरांचा एकही शब्द बदलेला नाही.राष्ट्रीय अपमानाचा बदला अवश्य घेतला गेला पाहिजे.तो कसा घेतला हे या नाटकात दाखवलं गेलं आहे.५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठे दोन तृतीयांश भारतावर राज्य करत होते.दिल्ली आमच्या ताब्यात होती. हा इतिहास आम्हाला आणि आमच्या शाळेमध्ये शिकविला जात नाही.आपण आपल्या देशाचा खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे.
महादजी शिंदे यांचा इतिहास ज्यांनी दिल्लीवर ५० वर्षे पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्य केलं.आजच्या काळात ‘पॉवर ऑफ ऍटर्नी’ म्हटले जाते, ती दिल्ली आपल्या ताब्यात होती.संपूर्ण देशावर आपला अधिकार होता.आमच्या देशाच्या शाळेत हे शिकविले जात नाही, हे दुर्दैव आहे.आज सरकारचे प्रमुख देखील शिंदे आहेत.त्यांना ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटक पाहण्याची प्रेरणा व्हावी आणि खार इतिहास नाटकाच्या माध्यमातून जनतेसमोर यावा, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली, तसेच त्यांनी ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचे अनेक ठिकाणी प्रयोग व्हावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नाटकाच्या रूपात खरा इतिहास डोळ्यासमोर उभा
स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी देखील सर्व कलाकार, निर्माते अनंत पणशीकर, निर्माते, दिग्दर्शक यांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्या म्हणाल्या की, व्यावसायिक नाटक करत असताना एका टप्प्यावर अशा स्वरूपाचे सादरीकरण करायचे जे राष्ट्रहिताचे असेल, हा विचारच खूप मोठा असल्याचे त्या म्हणाल्या.त्यांनी ‘माझी जन्मठेप’ चे प्रयोग केले.हे देखील अवघड होते आणि नाटक ‘संगीत उत्तरक्रिया’ देखील सोपे नव्हते.पानीपतचा पराभव एवढेच आम्हाला सांगण्यात आले आहे.आम्हाला हे नाही सांगितले की, पेशवा माधवराव यांनी याचा बदला घेतला.वीर सावरकरांनी सांगितले होते की, ‘जी कामे व्याख्यानांनी होत नाहीत, ती कामे नाटकाने होतात’.यासाठी त्यांनी ‘नाटक’ हे माध्यम निवडले.वास्तविक, या नाटकाच्या रूपात इतिहास समोर येत आहे, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.