मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासह बैठकीमध्ये आणखी ९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी, दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता.
हे ही वाचा:
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन!
लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
- राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २,८६३ आणि सहाय्यभूत ११,०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५,८०३ पदे बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
- ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात ५० हजारांवरून वरुन १ लाखांपर्यंत वाढ.
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
- श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.