दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडली पूजा

दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन

संपूर्ण देशभरात दसऱ्याचा उत्साह असताना देशाच्या सीमावर्ती भागातही जवानांकडून दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन करण्यात आले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्य दलासोबत दसरा विजयादशमी साजरी केली. तवांग येथील भारत- चीन सीमेवर राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील बमला येथून सीमेच्या पलीकडे तसेच असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचे निरीक्षण केले. शस्त्रपूजनाचा व्हिडीओ एक्सवर म्हणजेच ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. “विजयादशमीच्या पवित्र दिवशी तवांगमध्ये शस्त्रपूजा.” असे कॅप्शन देण्यात आले आहे. यावेळी जवानांना संबोधन करताना त्यांनी जवानांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी केले. देशातील नागरिकांना या गणवेशाचे महत्त्व माहित असून समस्त नागरिकांना सैनिकांप्रती आदर आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

हमासकडून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!

भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!

तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत

११ वर्षांनंतर पुन्हा तेच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा

“जवानांनी सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत आणि त्यामुळेच जगासमोर भारताचा दर्जा झपाट्याने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा दर्जा उंचावला आहे, भारताने आर्थिक विकास केला आहे. जवानांनी देशाची सीमा सुरक्षित ठेवली नसती तर, हे शक्यच झालं नसतं,” असंही राजनाथ सिंह म्हणाले.

Exit mobile version