दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जबरदस्त उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. जागोजागी रोषणाई केली असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ‘एक्स’ सोशल मीडिया साइटवर लिहिले आहे की, देशवासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिव्य सणानिमित्त मी सर्वांना निरोगी, आनंदी आणि भाग्यवान आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांवर आशीर्वाद लाभो.
देशवासियों को दीपावली की अनेकानेक शुभकामनाएं। रोशनी के इस दिव्य उत्सव पर मैं हर किसी के स्वस्थ, सुखमय और सौभाग्यपूर्ण जीवन की कामना करता हूं। मां लक्ष्मी और भगवान श्री गणेश की कृपा से सबका कल्याण हो।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येतील भव्य मंदिरात रामललाची स्थापना झाल्यानंतर साजऱ्या करण्यात आलेल्या पहिल्या दिवाळीबद्दलही भाष्य केले होते. अयोध्येतील भव्य मंदिरात रामललाची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे आणि ही पवित्र वेळ ५०० वर्षांच्या त्याग आणि तपश्चर्यानंतर आली आहे. अलौकिक अयोध्या! अयोध्येतील श्री रामललाच्या मंदिराचे हे अनोखे रूप सर्वांना भारावून टाकणारे आहे.
हे ही वाचा :
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!
५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी
मसालाकिंग धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट
‘नवाब मलिक यांच्या विरोधात प्रचार करणार’
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणानंतर अयोध्येत यंदा पहिली दिवाळी साजरी झाली. ५०० वर्षांनंतर मोठ्या थाटात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीसाठी अयोध्या नगरी नटून थटून तयार झाली होती. दिवाळीनिमित्त अयोध्येतील रस्ते सजले होते. शहरातील गल्लीबोळपासून शरयू नदीतील घाटापर्यंत सर्वत्र झगमगाट पसरला होता. अयोध्या नगरीत भगवान रामांचे चरित्र दाखवणारे देखावे साकारण्यात आले आहेत. शिवाय शरयू नदीच्या काठी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीताचे सादरीकरण केले गेले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत शरयू नदीच्या काठावर हजारो लोकांनी विशेष आरती केली. अयोध्येतील शरयू घाट आणि श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी २८ लाख दिवे प्रज्वलित केले गेले.