आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’

१००० मातांना मिळणार याचा लाभ

आरएसएसच्या  पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’

राष्ट्रसेविका समिती अर्थात आरआरएस या महिला शाखा आयोजित जेएनयु विद्यापीठात स्त्री रोग तज्ञांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘संवर्धिनी न्यास’ नावाच्या या विगने गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार नावाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत गर्भवती महिलांना भगवान श्रीराम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे जीवन आणि संघर्ष याविषयीचे ज्ञान शिकवले पाहिजे  असे त्यांनी म्हंटले आहे. म्हणजे पुढील पिढी निर्माण होताना गर्भामधूनच या गोष्टी शिकू लागतील.

 

‘संवर्धिनी न्यास’ हि शाखा गर्भ संस्कार या मोहिमे अंतर्गत सर्व स्त्री रोग तज्ज्ञांशी संपर्क साधणार आहेत. हे डॉक्टर्स गर्भवती महिलांपर्यंत पोचून त्यांना बाळ जन्माला येईपर्यंत भारतीय संस्कृती कशी रुजवता येईल हे शिकवणार आहेत. जेएनयू मध्ये झालेल्या या कार्यक्रमात अनेक स्त्री रोग तज्ज्ञांनी सहभागी होऊन या प्रक्रियेची माहिती करून घेतली. संवर्धिनी न्यासाच्या या कार्यक्रमात एकूण बारा राज्यातून ७० ते ८० तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. बहुतेक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयुर्वेदचे डॉक्टर सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. मात्र त्यां या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नव्हत्या. संवर्धिनी न्यासच्या राष्ट्रीय सचिव माधुरी मराठे यांनी सांगितले कि, जिजामाता यांनी छत्रपती गर्भामधेच असताना त्यांनी त्यांना स्वराज्याचे बाळकडू हे गर्भसंस्कारद्वारे दिले होते. महिलांनी गर्भारपणातच बाळाला संस्कार देण्याचे काम सुरु करणे गरजेचे आहे. आईच्या पोटांत बाळ ५०० शब्द शिकू शकते. हि मोहीम महिलेच्या गरोदरपणापासून सुरु होऊन ते मूल दोन वर्षाचे होईपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेदरे १००० महिलांपर्यंत हि मोहीम पोहोचवण्याची योजना असणार आहे.

Exit mobile version