मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम जोमाने सुरू आहे. अशातच मेट्रो- ३ नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे. आरे ते बीकेसी या टप्प्यात ही भूमिगत मेट्रो धावत असून याचा फायदा लोकांना होणार आहे. सोमवारपासून ही मेट्रो सेवा सुरू झाली असून लोकांनी या मार्गाला उदंड प्रतिसाद दिला आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मेट्रो मार्गांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मेट्रो ३ या भूमिगत मेट्रो मार्गाची प्रतीक्षा मुंबईकरांना बऱ्याच काळापासून होती. अखेर मुंबईकरांची या मेट्रोची प्रतीक्षा संपली असून सोमवारपासून आरे ते बीकेसीपर्यंत पहिल्या टप्प्यात या भुयारी मार्गातून प्रवासाला सुरुवात झाली.
हे ही वाचा..
अविवाहित स्त्री वेश्येपेक्षा वेगळी नाही, झाकीर नाईक बरळला
दुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’ – कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी
मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार
मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत
सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. पहिल्या दिवशी तब्बल १५ हजार ७१३ मुंबईकरांनी बीकेसी ते आरे या प्रवासमार्गाचा आनंद लुटला. मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्याच्या मार्गामुळे आता मुंबईकरांच्या सेवेत ५९ किमी अंतराचे मेट्रो जाळे दाखल झाले आहे. मुंबई महानगरात जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे.