मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत आता दर्जेदार शिक्षण देण्यासह अनेक उपक्रम राबवले जातात. त्याच आधारावर आता मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बालवाड्यांचे जिओ मॅपिंग (अक्षांश-रेखांश) केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील बालवाड्या किती आणि कुठे आहेत यांची माहिती आता मुंबई महानगर पालिकेच्या एका क्लिकवर कळणार आहे. महानगरपालिकेतील बालवाड्यांची संख्या कमी असून, अधिक पैसे खर्च करून पालक खाजगी बालवाड्यात वळतात. याच आधारे आता पालिका शिक्षण विभागाने बालवाड्यांचे सक्षमीकर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने बालवाड्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच बालवाड्यांचा भोगौलिक स्थान दाखवणारा नकाशा मॅपिंग करण्याचे ठरवले आहे. त्याच प्रमाणे कुठल्या ठिकाणी किती बालवाड्यांची आवश्यकता आहे. याची चाचपणी केली जाईल. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत ८७१ बालवाडी येतात. तसेच २०१९- २० मध्ये जवळपास २८ हजार ५३३ विद्यार्थी शिक्षण घेत होते. बालवाडी पासूनच गळती रोखून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा महानगर महानगर पालिकेचा मुख्य उद्देश आहे. तसेच महानगर पालिकेकडून बालवाड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी १० कोटी १२ लाख रुपयांची तरदूत पालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. गरजेनुसार नवीन बालवाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती
मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज
भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी
उरीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा
बालवाड्यांची कार्यपद्धती ही अंगणवाडीप्रमाणे करण्यात येणार असून सर्व सुविधा मुलांना उपलब्ध करून देण्यात आहेत. तसेच आरोग्य सुविधा आणि पोषणाची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे. याकरिता महिला व बालविकास विभागाच्या वतीने कार्यपद्धती तयार करण्यात येणार असून, बालकांचे वजन व उंची मोजण्यासाठीचे साहित्य खरेदी करून, सर्व बालवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारची माहिती आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजनांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार आहे.