राष्ट्रीय टपाल दिनी ५० हजार खात्यांची ‘बचत’

राष्ट्रीय टपाल दिनी ५० हजार खात्यांची ‘बचत’

सध्याच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामध्ये टपाल खात्याने ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह तसेच हा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये एचसी अग्रवाल, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, यांनी प्रत्येक दिवसाच्या कामाचा तपशील माध्यमांसमोर सादर केला. महाराष्ट्र सर्कलने तब्बल ४९,६९० बचत खाती उघडत विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तसेच १६,२०० सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आलेली आहेत.

९ ऑक्टोबर, १८७४ मध्ये बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या मुख्यालयाची स्थापना झाली होती. हा दिवस विश्व टपाल दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून तसेच अमृत महोत्सवाचा उपक्रमही याच्याशी जोडण्यात आलेला होता. ११ ऑक्टोबरला राज्यभरातील २५४ ठिकाणी बॅंकिंग दिवस पार पडला. यादिवशी एका दिवसामध्ये तब्बल ४९,६९० बचत खाती उघडण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबरला टपाल जीवन विमा दिवस साजरा करण्यात आला. याअंतर्गत दिवसभरामध्ये १७,६३१ विम्यांची विक्री करण्यात आली.

पीएलआय (पोस्टल लाइफ इन्शुरन्स) १२ ऑक्टोबरला महाराष्ट्र सर्कलमध्ये 1१७,६०० पीएलआय आणि ग्रामीण पीएलआय पॉलिसी विकल्या गेल्या. १२,५०० याचे मुख्य उद्दीष्ट होते. परंतु त्याहीपेक्षा जास्त पीएलआय विकल्या गेल्या. अनेक विमा नसलेल्या लोकांना विम्याची महती याकाळात पटवून देण्यात आली. तसेच विमा संरक्षण वाढवण्यासाठी महिन्यातून दोनदा विशेष मोहीमही राबवली जात आहे.

 

हे ही वाचा:

आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

 

१३ ऑक्टोबरला टपाल तिकिटांद्वारे ‘जर्नी ऑफ इंडिया @75’ वर आधारित एक फिलाटेलिक प्रदर्शन मंडळ कार्यालयात प्रदर्शित झाले. उमाजी नाईक, पुरुषोत्तम काकोडकर, मोहन रानडे आणि मणिबेन पटेल, “महाराष्ट्राचे न सांगलेले नायक” यांच्यावर विशेष पोस्टर कव्हर प्रसिद्ध करण्यात आले.

Exit mobile version