भारतातील नव्या वातावरणामुळे चित्त्यांचे मृत्यू !

नामिबियाचे उच्चायुक्त गॅब्रिएल सिंम्बो यांचे मत

भारतातील नव्या वातावरणामुळे चित्त्यांचे मृत्यू !

भारताच्या चित्ता प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण २० रेडिओ कॉलर चित्ते आणण्यात आले. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० चित्यांपैकी आतापर्यंत ९ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. नामिबियाचे उच्चायुक्त गॅब्रिएल सिंम्बो यांनी चित्त्यांचे मृत्यूचे कारण ‘सामान्य’ असल्याचे सांगितले कारण भारतातील नवीन वातावरणामुळे चित्यांना हे जड जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतामधून नामशेष झालेला चित्ता पुन्हा भारतात येण्यासाठी भारताने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण २० रेडिओ कॉलर चित्ते आणले.त्यानंतर ९ चित्त्यांचा मृत्यू झाला.या संदर्भात नामिबियाचे उच्चायुक्त गॅब्रिएल सिंम्बो यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले, चित्त्यांचे मृत्यूचे कारण ‘सामान्य’ आहे कारण अचानकपणे कोणत्याही प्राण्याला दुसरीकडे स्थलांतरित केले जाते तेव्हा तेथील वातावरण जुळवण्याकरता प्राण्याला वेळ लागतो त्यामुळे प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. तसेच कुनो उद्यानात शिल्लक असलेले चित्ते भारतातील वातावरण पूर्णपणे जुळवून घेण्यास सक्षम होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

जेव्हा आपण प्राण्यांना नवीन वातावरणाशी ओळख करून देतो तेव्हा काही आव्हाने असतात त्यातीलच एक आव्हान म्हणजे मृत्यू.या स्वरूपाच्या कोणत्याही प्रकल्पाचा हा एक भाग आहे,” सिनिम्बो म्हणाले.नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० चित्त्यांमधील ”ज्वाला” चित्त्याने चार पिलांना जन्म दिला. यांची संख्या २४ झाली यातील आतापरायणात ९ चित्ते मरण पावले आहेत.“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मांजरांच्या प्रजातींचा पुन्हा परिचय करून देण्याचा हा एक अभिनव प्रकल्प आहे आणि आमचे एकमेकांना आधार देण्याचे नाते पाहता नामिबिया या उपक्रमामुळे खूप खूश आहे,” सिनिम्बो म्हणाले.

हे ही वाचा:

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीकचे निधन

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

चीनचे अध्यक्ष जिनपिंग जी-२० परिषदेला अनुपस्थित राहणार, मग कोण येणार?

एक देश एक निवडणूक; समितीमधील सहभागास अधीर रंजन चौधरी यांचा नकार !

१६ जुलै रोजी पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या २० पैकी पाच प्रौढ चित्ते नैसर्गिक कारणांमुळे मरण पावले आहते. तसेच रेडिओ कॉलर सारख्या कारणांमुळे चित्त्यांचे मृत्यू झाल्याचे मीडियामार्फत दाखवण्यात आले मात्र, या सर्व गोष्टी वैज्ञानिक पुराव्यांशिवाय अनुमान आणि ऐकण्यावर” आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि, कुनो राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्य आणि नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांनी उद्यानातील सहा चित्यांच्या रेडिओ कॉलर “आरोग्य तपासणी” साठी काढल्या आहेत.कुनोमध्ये चौदा चित्ते – सात नर, सहा मादी आणि एक मादी शावक – कुनोमध्ये ठेवले आहेत. कुनो वन्यजीव पशुवैद्य आणि नामिबियातील तज्ञ यांचा समावेश असलेली टीम त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवत आहे.७० वर्षांपूर्वी नामशेष झालेला चित्ता पुन्हा भारतात आणल्याने त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे.

 

Exit mobile version