खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेत केले वक्तव्य

खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान बोलत असताना ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’, असे विधान केले. मात्र आपली चूक कळताच त्यांनी लगेचच सारवासारव केली.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी प्रचारसभेदरम्यान राजीव गांधी यांचा उल्लेख करताना चुकून राहुल गांधी यांचे नाव घेतले. ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले,’ असे वक्तव्य त्यांनी केले. भाजपने लगेचच तत्परता दाखवून त्यांच्या या विधानाची खिल्ली उठवण्याची संधी सोडली नाही. राजस्थानमधील अनुपगढ येथील प्रचारसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली,’ असे विधान भाषणादरम्यान केले.

हे ही वाचा:

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार!

विधानसभेत जबाब नोंदविण्यासाठी पहिल्यांदाच विटनेस बॉक्स

हे विधान केल्यानंतर लगेचच कोणीतरी खर्गे यांना तुम्ही चुकीचे बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर खर्गे यांनी लगेचच आपल्या चुकीची दुरुस्ती केली. ‘मी माफी मागतो. मी चुकून राहुल गांधी यांचे नाव घेतले. राजीव गांधी यांनी राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. काँग्रेसकडे असे नेते आहेत, ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे तर, भाजपकडे दुसऱ्यांचे जीव घेणारे नेते आहेत,’ असे ते यावेळी म्हणाले.

मात्र या विधानानंतर भाजपने खर्गे यांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. खर्गे यांची क्लिप ‘एक्स’वर पोस्ट करत ‘हे कधी झाले?’ अशा शब्दांत खर्गे यांची खिल्ली उडवली आहे.२०० जागा असणाऱ्या राजस्थान विधानसभेची निवडणूक २५ नोव्हेंबरला होत असून निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

Exit mobile version