महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आनंदयात्री पु.ल. देशपांडे यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त कोहिनूर प्रस्तुत व नेक्स्टजेनइनोव्हेट ग्लोबल सोल्युशन्स प्रा. लि.च्या सहयोगाने आशय फिल्म व सांस्कृतिक क्लब यांनी सोमवार १२ जून रोजी ‘पु.ल. स्मृती सायंकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
पुण्याच्या स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याचे उदघाटन कोहिनुर ग्रुपचेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर “पुलंच्या पाऊलखुणा” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, आनंद इंगळे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, संगीतकार कौशल इनामदार आणि साहित्यिक मिलिंद जोशी सहभागी होणार आहेत. याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका मंगला गोडबोले करणार आहेत.
हे ही वाचा:
बंगालमधील कोरोमंडल अपघातग्रस्तांना दोन हजारांच्या चलनी नोटांमध्ये मदत
पंतप्रधान मोदींनी शिक्षण घेतलेली शाळा बनणार ‘प्रेरणा स्थळ’
कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार
त्यानंतरच्या सत्रात पुलंच्या अनेकविध भाषणांतील दुर्मिळ दृष्यफितींवर आधारीत अनोखा लघुपट…’वक्ता दशसहस्रेषु’ याचे सादरीकरण होणार आहे. याचे निवेदन स्नेहल दामले करणार आहेत. सादर कार्यक्रम फक्त आशय सदस्य व निमंत्रितांसाठी असून, शिल्लक प्रवेशिका वाटप रविवार ११ व सोमवार १२ जून (स. १० ते दु. १ या वेळात) स.प. महाविद्यालय, टिळक रोड, मेन गेट येथे होणार असल्याचेही संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.