महाराष्ट्रात कोरोना भलत्याच वेगाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण टाळेबंदी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या टाळेबंदीच्या भितीने मुंबईतील मजूरांचे गावाकडे होत असलेले स्थलांतर सलग बाराव्या दिवशी देखील पहायला मिळाले आहे.
महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. मागच्या टाळेबंदीमध्ये अनेकांचे काम बंद झाले होते. यावेळी देखील हाताला काम नसेल तर महाराष्ट्रात रहायचे कशाला अशी भावना यापैकी अनेक मजूरांनी व्यक्त केली आहे. मजूरांच्या या स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल वर अलोट गर्दी पहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
जी७ परिषदेसाठी भारताला निमंत्रण
पोलिसांच्या मदतील धावला मुंबईतील उद्योजक
शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया
कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केवळ तातडीच्या केसेसवरच सुनावणी होणार
महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करून काही व्यवसाय बंद करण्यास सुरूवत केली तेव्हापासूनच मजूरांनी मुंबईतून बाहेर जायला सुरूवात केली होती. तेच सलग बाराव्या दिवशी देखील चालू असलेले आढळून आले.
महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीत देखील हे आढळून आले होते. दिल्लीमध्ये सोमवारपासून संपूर्ण टाळेबंदीची घोषणा करण्या आली होती. त्यामुळे परप्रांतिय मजूरांनी गावाची वाट धरली होती. परिणामी दिल्लीच्या आनंद विहार बस टर्मिनलवर मोठी गर्दी जमा झाली. यावेळी बस कंत्राटदारांनी तिकिटाचे दर वाढवले. जिथे आधी ₹२०० लागत होते त्याठिकाणी ₹३०००- ₹४००० दर आकारायला सुरूवात केल्याने अनेक मजूरांना आता घरी परतायचे कसे असा प्रश्न पडला होता.