ओमिक्रॉन प्रकाराने कोविड-19 साथीच्या रोगाला एका नवीन टप्प्यात आणले आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा विषाणू ९० टक्के शहरांमध्ये पसरला आहे. सध्या नव्या रुग्णामध्ये ९२ ते ९५ टक्के लोक हे ओमिक्रॉनने बाधित असतात. आता देशात ओमिक्रॉन लाटेची मध्यावस्था सुरु आहे. कोरोना महामारी संपण्याच्या दिशेने या संसर्गाची वाटचाल सुरु आहे, असे केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात नेमलेल्या कृती गटाचे प्रमुख व इन्साकॉग गटाचे अध्यक्ष प्रा.एन. के.अरोरा यांनी म्हटले आहे.
कोरोनाची महामारी कधी संपेल, हे नक्की सांगता येणार नाही. मात्र, या महामारीची तीव्रता कमी होऊन ती एक केवळ साथ म्हणून उरणार आहे. असे अरोरा यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ओमिक्रॉन डेल्टापेक्षा कमी घातक आहे. तरीही कोरोना साथ लवकर संपण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार हा सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे. असे ते म्हणाले.
तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, ओमिक्रॉन मार्चपर्यंत ६० टक्के युरोपियन लोकांना संक्रमित करू शकते. सध्याची ओमिक्रॉन लाट संपली की, या वर्षाच्या अखेरीस हा विषाणू परत येऊ शकतो मात्र, युरोपमध्ये साथीची परिस्थिती संपुष्टात येईल.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’
शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…
तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?
ओमायक्रोन सब व्हेरिएंट BA.2 ची देशात एंट्री
एकदा ओमिक्रॉनची सध्याची युरोपभर पसरलेली लाट ओसरली की, काही आठवड्यात किंवा महिन्यात जगातील प्रतिकारशक्ती वाढेल. प्रतिकारशक्ती एकतर लसीमुळे किंवा संसर्गामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढेल. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये साधारणपणे कमी गंभीर संसर्ग होतो असे अभ्यासातून दिसून आले आहे.
निरोगी मुलांना बुस्टर डोस ची गरज नाही. डब्लूएचओ चे प्रमुख शास्त्रज्ञा सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, निरोगी मुलांना बुस्टर डोस देण्याची आवश्यकता नाही. तसेच कोरोना प्रकारच्या प्रत्येक प्रकारासाठी नवीन लस तयार करण्याचीही गरज नाही.