जगभरात धुमाकूळ घालणारा ओमिक्रोन आता भारतात फोफावताना दिसत आहे. देशातील ओमिक्रोन बाधितांची संख्या आता वाढू लागली असून या रुग्णांची संख्या १५१ वर पोहचली आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या सर्वाधिक ५४ आहे. ओमिक्रोनसह कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
देशातील ओमिक्रोन बाधित रुग्णांची संख्या १५१ वर पोहोचली असून महाराष्ट्रात ही संख्या ५४ आहे. आता कोरोना बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. महाराष्ट्रात रविवारी नव्या ९०२ रुग्णांची नोंद झाली आहे आणि नऊ मृत्यू झाले. महाराष्ट्रात ओमिक्रोनने पहिला शिरकाव डोंबिवलीमध्ये केला होता. त्यानंतर आता हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात रविवारी ओमिक्रोनचे नवे सहा रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे.
हे ही वाचा:
१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धुल करणार नेतृत्त्व
शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट
व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना
‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही
कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा जगाला अलर्टवर आणले आहे. भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही बंधने घातली आहेत. वाढती रुग्णासंख्या आणि आता नव वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतही १४४ कलम लागू केले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ओमिक्रोन हा कमी प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संबंधी नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.