कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये ओमिक्रोनची एंट्री

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रोनने भारतात प्रवेश केला असून आता कर्नाटक पाठोपाठ गुजरातमध्येही एका व्यक्तीला ओमिक्रोनची लागण झाली आहे. ओमिक्रोनचा रुग्ण आढळून आल्याची माहिती गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये ओमिक्रोन बाधित आढळून आलेला रुग्ण हा झिम्बाब्वे येथून आली असून जामनगर येथे हा रुग्ण आढळून आला आहे. या व्यक्तीचे वय ७२ वर्षे असून गुरुवारी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या ११ लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

कोस्टल रोडच्या कामातही बीएमसीचा भ्रष्टाचार?

सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

कर्नाटकमध्ये ओमिक्रोनच्या दोन रुग्णांची नोंद झाल्यावर महाराष्ट्राची चिंता वाढली होती. आता गुजरातमध्ये रुग्णाची नोंद झाल्यावर पुन्हा राज्याची चिंता वाढली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सापडलेले दोन्ही रुग्णांपैकी एक जण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असून त्याचे वय ६६ वर्षे इतके आहे. गेल्या महिन्यात तो दुबई मार्गे बंगळुरुमध्ये आला आहे तर, दुसरा रुग्ण हा एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये काम करणारा ४६ वर्षीय डॉक्टर आहे. डॉक्टरने कुठेही प्रवास केलेला नाही तरीही त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असणारा रुग्ण हा मात्र यंत्रणांना चुकवून देश सोडून गेल्याचे वृत्त होते.

Exit mobile version