ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

सुरिंदर चौधरी झाले उपमुख्यमंत्री

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरला मुख्यमंत्री मिळाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (१६ ऑक्टोबर) जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून सुरिंदर सिंग चौधरी यांनी शपथ घेतली आहे.

श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे झालेल्या शपथविधी समारंभात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, आप नेते संजय सिंह, सीपीआय नेते डी राजा यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

अपक्ष आमदार झालेल्या सतीश शर्मा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नॅशनल कॉन्फरन्सच्या सकिना इटू, जाविद दार, सुनिंदर चौधरी आणि जाविद राणा, यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ओमर अब्दुल्ला यांचा मुख्यमंत्री म्हणून हा दुसरा कार्यकाळ आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि पूर्वीचे राज्य २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर पदभार स्वीकारणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. २००९ ते २०१४ कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख तारिक हमीद कारा यांनी स्पष्ट केले आहे की, काँग्रेस पक्ष सध्या जम्मू-काश्मीर सरकारमध्ये सामील होणार नाही.

हे ही वाचा : 

प्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अंधार कोठडीत रवानगी?

लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू

बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई

 

Exit mobile version