लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात!

देशात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी होत आहे निवडणूक

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात!

लोकसभेच्या सभापतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहेत. सभापती पदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला हे उभे राहिले आहेत तर विरोधकांकडून के सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सभापतीपदासाठी देशात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.

सभापतीसाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने ही निवडणूक होत आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. तर इंडी आघाडीकडून के.सुरेश निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बुधवारी (२६ जून) पार पडणार आहे. देशात पहिल्यांदाच सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहमतीने सभापती निवडले जात होते. मात्र यावेळी ही परंपरा खंडित होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

बिर्यानीत लेग पीस नसल्याने लग्नात झाला राडा !

“आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही”

ड्रग्स सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!

मध्य प्रदेश; भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना भोपाळमधून अटक!

दरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांच्याकडेच येणार असल्याची चर्चा होती. सत्ताधारी आणि विरोधकांनीही बिर्ला यांच्या नावाला पसंती दिली होती. परंतु, विरोधकांनी एनडीएच्या ओम बिर्ला यांच्या विरोधात के. सुरेश यांना उभे केले आहे. उद्या (२६ जून) ११ च्या सुमारास यावर मतदान होणार आहे.

Exit mobile version