प्रेक्षकविरहित ऑलिम्पिक स्टेडियममध्ये खेळणार खेळाडू

प्रेक्षकविरहित ऑलिम्पिक स्टेडियममध्ये खेळणार खेळाडू

कोरोना पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा टोकियोमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना पार पडणार आहे. क्रीडा रसिकांना घरी राहूनच दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आनंद घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

जपानमधील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी जपानमध्ये आणीबाणी लागू केली आहे. सध्या लागू असलेली आणीबाणी संपल्यानंतर सोमवारपासून दुसरी आणीबाणी लागू होणार आहे. ही आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी होणारा ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्ट रोजी होणारा समारोप सोहळा क्रीडा प्रेमींना घरी बसूनच दूरचित्रवाणीवर पहावा लागणार आहे. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक संयोजन समितीने प्रेक्षकांविना ऑलिम्पिक खेळवणार असल्याचे जाहिर केले आहे.

हे ही वाचा:

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

नवे मंत्री अश्विनी वैष्णव पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये

आईची हत्या करून हृदय खाल्ले

टोकियो शहराला देखील कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोविडच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करत असल्याचे सुगा यांनी जाहिर केले होते. या आणीबाणीमध्ये बार, रेस्टॉरंट आणि काराओके पार्लर यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. गुरूवारी टोकियो शहरात ८९६ कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांचे टोकियोमध्ये आगमन झाले. त्यानंतर त्यांनी ऑलिम्पिक समितीच्या मुख्यालयाला भेट दिली होती.

Exit mobile version