ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली घोषणा

ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर !

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसळेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषणा केली आहे. शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरीसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.

हे ही वाचा:

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का?

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

 

मुख्यंमत्री शिंदे म्हणाले की, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

Exit mobile version