ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक

या स्पर्धेत नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये केलेला त्याचाचं विक्रम मोडला

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राची डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत लौजाण डायमंड लीग २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. नीरज चोप्रा याने लौजाण डायमंड लीग २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. याशिवाय या स्पर्धेत नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये केलेला त्याचाचं विक्रम मोडला आहे.

नीरज चोप्राने मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत डायमंड लीग २०२४ मध्ये दुसरे स्थान मिळविले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे दुखापतग्रस्त असतानाही डायमंड लीगमध्ये त्याने स्वतःचा विक्रम मोडला. नीरज चोप्राने स्वतःचा विक्रम मोडत ८९.४९ मीटर भालाफेक केली, जो या हंगामातील त्याचा सर्वोत्तम थ्रो होता.

नीरज चोप्राने डायमंड लीग २०२४ मध्ये सहाव्या प्रयत्नात आपला सर्वोत्तम थ्रो केला. नीरज या स्पर्धेत ९० मीटरचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा होती मात्र, दुखापतीमुळे त्याला ते शक्य झाले नाही. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी (तिसरा लेग) नीरजने दुसरे स्थान पटकावले. तर, परंतु ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने ९०.६१ मीटर भालाफेक करून पहिले स्थान पटकावले. जर्मनीचा ज्युलियन वेबर हा ८७.०८ मीटर भालाफेक करत तिसरा राहिला.

डायमंड लीग २०२४ मधील नीरज चोप्राचे थ्रो

हे ही वाचा:

पूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

मुख्यमंत्र्यांनी केली उद्धव ठाकरेंची पोलखोल, कोर्टाची कॉपीच दाखविली !

अयोध्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खानचे शॉपिंग कॉम्प्लेक्स ‘भुईसपाट’

नीरज चोप्रा सध्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे, पण तरीही त्याने या लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पात्रता फेरीत नीरज चोप्रा चार प्रयत्नांत चौथ्या स्थानावर राहिला. पण नंतर कमबॅक करत त्याने दुसरे, तिसरे स्थान पटकावले. नीरजने ८९.४९ मीटरचा शेवटचा बेस्ट थ्रो केला.

Exit mobile version