ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे सुवर्णयश

फेडरेशन कपच्या अंतिम फेरीत ८२.७९ मीटर अंतरावर भालाफेक

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे सुवर्णयश

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजने तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर भारतातील स्पर्धेत भाग घेतला. त्याने चौथ्या प्रयत्नात ८२.२७ मीटरचे अंतर गाठले.

भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमवर ही स्पर्धा झाली. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. डीपी मनू याने ८२.०६ मीटर तर, उत्तम पाटील याने ७८.३९ मीटर अंतरावर भालाफेक करून स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर, पॅलिस ऑलिम्पिक २०२४मध्ये सहभागी होणारा किशोर कुमार जेन्ना याला ८० मीटरचा टप्पाही पार करता आला नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी ७५.४९ मीटर होती.

नीरजने मार्च २०२१मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर तो भारतातील कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. पॅरिस ऑलिम्पिक गेम्ससाठी तयारी करणाऱ्या नीरज चोप्रा याने कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी स्वतःला जास्त त्रास करून घेतला नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार असून ती ११ ऑगस्ट २०२४पर्यंत चालणार आहे.

हे ही वाचा:

दक्षिण-पश्चिम मान्सून ३१ मेच्या सुमारास केरळ पोहोचणार

“सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन तयार”

उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?

‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’

नीरजने गेल्या आठवड्यात झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. नीरज चोप्रा यने सन २०२१मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२३मध्ये त्याने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशाला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याआधीच्या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत नीरजने रौप्यपदकाची कमाई केली होती.

Exit mobile version