ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना योगी सरकारकडून मोठे बक्षीस!

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना योगी सरकारकडून मोठे बक्षीस!

सहभागी होणाऱ्यांना १० लाख तर, सुवर्ण पदक जिंकल्यास ६ कोटी मिळणार

टोक्यो ऑलिम्पिक सुरु होण्यास काही दिवसच उरले आहेत. आजच संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधला. भारताचे १२६ खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत. दरम्यान या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूसाठी उत्तर प्रदेश सरकारने पुरस्कारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा करत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे. तसेत स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ६ कोटी रुपयांच्या बक्षिसाची देखील घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणऱ्या १० खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. युपींमधून ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये शूटर सौरभ चौधरीही सामिल आहे. सरकारने घोषणा केलेल्या पुरस्कांरानुसार सहभागी सर्व खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील. तर सिंगल इवेंटमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूला ६ कोटी तर टीम इवेंटमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना ३ कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय़ राज्य सराकरने घेतला आहे.

हे ही वाचा:

पुण्यात येत आहे स्पुटनिक लस, केव्हा? वाचा…

वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!

नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

टोक्यों ऑलिम्पिकमध्ये एकूण १८ प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय  खेळाडू सहभाग घेणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या १२६ आहे. ही आतापर्यंत भारताकडून ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आलेली सर्वाधिक संख्या आहे. यावेळी भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलिम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने देशाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

Exit mobile version