35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषघरात जुन्या नोटा, बँकेत लाखो रुपये

घरात जुन्या नोटा, बँकेत लाखो रुपये

Google News Follow

Related

अनके वर्षे अंथरुणाला खिळलेल्या आणि एकाकी जीवन जगणाऱ्या कौशल्या वाधवा या ८० वर्षांच्या वृद्धा आपल्या घरात गुजराण करीत होत्या. लॉकडाऊनच्या काळात कुणी देईल त्या अन्नावर जगत होत्या. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश तेजवानी आणि पप्पू पमनानी यांना समजले. वृद्ध महिलेकडे साधारण आठ लाखांची रक्कम बँक खात्यात पडून असल्याचे कळाले; तर घरातील कपाटात जुन्या ५०० रुपयांच्या नोटा असलेले ८५ हजार रुपयांचे पुडके सापडले. कौशल्या यांच्या घरात पोहचताच कार्यकर्त्यांनी कौशल्या यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु घरात चोरी होण्याची शक्यता असल्याने त्याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली.

कौशल्या या १५७५ क्रमांकाच्या बराकीत एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घराचा काही भाग कोसळल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांच्या घरी गेले असता त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरी येताच साऱ्या मालमत्तेची खातरजमा केली. कौशल्या यांच्या खाण्याची सुविधा केल्यानंतर पोलिसांना कपाटातील ८५ हजार रुपये, शंभरच्या नोटांचे बंडल, सोन्याच्या बांगड्या, कानातील दागिने तसेच बँकेतील १० लाख रुपयांच्या ठेवींची कागदपत्रे सापडली.

हे ही वाचा:

देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

ठाकूर तो छा गियो

२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत

रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग

रुग्णालयात उपचार घेतल्यावर वृद्ध महिलेला घरी सोडण्यात आले. कौशल्या या नोकरी करत होत्या. त्यांचे पती हरपालसिंह यांचे निधन झाले आहे. कौशल्या यांना अपत्य नाही. हरपालसिंह यांना दृष्टीदोष असल्यामुळे ते मंदिरात भजन- कीर्तन करीत असत. त्यांच्या पुतण्याचेही निधन झाले असून सून मुलुंडमध्ये राहत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा