35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषवर्ध्यात जुन्या नाण्यांचा संग्रह आढळला

वर्ध्यात जुन्या नाण्यांचा संग्रह आढळला

Google News Follow

Related

वर्धा येथे जुन्या घराचे खोदकाम चालू असताना अचानक पुरातत्व वस्तुंचे घबाड हाती लागले आहे. यामध्ये जुन्या काळातील काही नाण्यांसह सुमारे ४ किलो सोने सापडले आहे. हे सोने मुघल काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेबद्दल समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे सोने ताब्यात घेतले आहे.

वर्ध्याच्या नाचणगाव येथे शेतकरी सतीश चांदोरे यांनी जुने घर विकत घेतले होते. या जुन्या घराचं खोदकाम त्यांनी सुरू केले. खोदकामातील मातीचा ढिगारा शेतात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान हा ढिगाराही साफ करण्यात आला. हा कचरा साफ करताना मजुरांना यात एक डबी कचऱ्यात सापडली ज्या डबीमध्ये सोनं होते. त्यात एक सोन्याचं बिस्कीट आणि मुघलकालीन नाणी, कानातील रिंग अशी एकूण ९ आभूषणे होती. या सोन्याचे वजन ४ किलो २८ ग्रॅम इतके भरले. या सोन्याची आजची किंमत २० लाख ५४ हजार इतकी आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली. त्याबरोबरच मुघलकालीन नाणी यात सापडली असल्याने पुलगाव शहराच्या इतिहासाबाबत नवीन माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही नाणी इथे कशी आली? मुघलकाळातील कोणत्या राजाच्या काळातील ही नाणी आहे? त्या मागचा इतिहास काय आहे? आदींचा अभ्यास करण्यात पुरातत्व विभागाला मदत होणार असल्याचंही रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर

शेतात सोनं सापडल्याची माहिती मिळताच शेतकरी चांदोरे याने मजुरांकडून हे सोने स्वतःकडे घेतले होते. परंतु, मजुरांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांना माहिती मिळताच शेतकऱ्याला गाठण्यात आले आणि सोने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सोन्याचं घबाड सापडल्याने पंचक्रोशीत चर्चांना एकच उधाण आलं असून सोनं पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकजण नाचणगाव गाठताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा