रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये केली दमदार कामगिरी

रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा हा ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत रोहन याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यु एब्डेन आच्यासोबत इटलीच्या सायमोन बोलेली आणि अँड्र्यू वावास्सोरी यांचा पराभव केला. ४३व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकून रोहन याने स्वतःचे नाव इतिहासात नोंदवले आहे. त्याने सायमन बोलेली आणि अँड्र्यू वावास्सोरी यांचा ७-७ (७-०), ७-५ असा पराभव केला.

रोहन याने जीन-जुलियन रोजेर याचा विक्रम मोडला. त्याने ४० वर्षे २७० दिवसांचा असताना मार्सेलो ऍरेव्होला याच्यासोबत फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. मेलबर्न पार्क येथे एखाद्या भारतीयाने विजेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. सन २०१२मध्ये लिअँडर पेस आणि रॅडेक स्पनेक यांनी येथे विजेतेपद मिळवले होते. बोपण्णाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम आहे. त्याने सन २०१७मध्ये मिश्र दुहेरीमध्ये गॅब्रिएला डाब्रोवस्कीसोबत फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

हे ही वाचा:

कर्ज काढून मुलाचा मृतदेह मागवण्याची वेळ!

जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…

हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!

‘आयपीएस अधिकाऱ्या’ने केलेल्या कृतीमुळे त्याचे बिंग फुटले

अंतिम सामन्यातील पहिला सेट चुरशीचा झाला. टायब्रेकरवर गेलेल्या सामन्यात बोपण्णा आणि एब्डेन यांनी उत्कृष्ट दर्जाचा खेळ खेळून इटालियन जोडीला नामोहरम केले. दुसरा गेमही टायब्रेकवर जाण्याची चिन्हे होती. मात्र बोपण्णा व एब्डेन यांनी सर्व्हिस ब्रेक केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या वर्षी बोपण्णा याने सानिया मिर्झासोबत अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र तेव्हा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हे वर्ष बोपण्णासाही अविस्मरणीय ठरते आहे. दुहेरीतील उपांत्य सामना जिंकल्यानंतर बोपण्णा हा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला होता. तर, क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल पद्मश्री जाहीर झालेल्या सात खेळाडूंमध्ये बोपण्णा यांचाही समावेश होता. त्याने याच आठवड्यात व्यावसायिक कारकिर्दीतील ५००व्या विजयाची नोंद केली.

Exit mobile version