29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेष...या कारखान्यात सगळी कामे सांभाळत आहेत फक्त महिला

…या कारखान्यात सगळी कामे सांभाळत आहेत फक्त महिला

Google News Follow

Related

सध्या महिलांना सर्वच क्षेत्रात कामाची समान संधी मिळू लागली आहे. चेन्नईमधील कारखान्यात १० हजार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

नुकतेच ओला इलेक्ट्रिक स्कूटर कारखान्यात सर्व पदांचा कारभार फक्त महिलाच सांभाळतील, अशी घोषणा ओलाचे सह संस्थापक भाविश अग्रवाल यांनी केली आहे. केवळ महिला कामगार असणारा हा जगातील सर्वात मोठा कारखाना असणार आहे. हा एक सकारात्मक बदल सध्या समाजात पहायला मिळत आहे, जिथे महिलांनाही कंपनीच्या सर्व पदांवर योग्य संधी मिळून कठीण आणि कष्टसाध्य काम करता येत आहे.

कारखान्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याकडे फक्त लक्ष न देता महिलांना वेगळ्या सोयीसुविधाही देण्यात येत आहेत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांसाठी वेगळी प्रसाधनगृहे, त्यांच्या कामाच्या वेळा, त्यांच्या प्रवासाची सोय आदी सोयी महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे ही वाचा:

नदीत ११ जण बुडाले, तिघांचा मृत्यू

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

कांदिवलीतली १६ वर्षीय मुलगी हैदराबादेत कशी सापडली?

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

कारखान्यात सर्व महिला कर्मचारी असल्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या उभे राहण्यासाठी संधी निर्माण होतील, असे भाविश अग्रवाल यांनी सांगितले. महिलांना संधी दिल्यावर त्यांनी सर्व पदांची कामे यशस्वीपणे पूर्ण केली. क्रेन सारखी अवजड वाहनेही त्यांनी हाताळायला सुरुवात केल्याचे वेदांत अ‍ॅल्युमिनियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शर्मा यांनी सांगितले. सुरुवातीला महिलांच्या कुटुंबियांना कारखान्यात बोलावून परिस्थिती समजावली. तसेच जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या घरांना भेटी दिल्या, त्यांना प्रोत्साहन दिले, असे एमजी च्या अधिकाऱ्यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.

सध्या कर्नाटकमधील आयटीसीच्या फूड युनिटमध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत. फॉक्सकॉन ग्रुपच्या राइजिंग स्टारमध्ये २५ हजार महिला कर्मचारी आहेत. एमजीच्या कारखान्यात ३५ टक्के महिला कार्यरत आहेत. हिरो मोटरमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून एक हजार करण्यात आली आहे. टायटन या घड्याळाच्या कंपनीच्या कारखान्यातही महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा