अहो आश्चर्यच ! राजीव गांधी यांच्या हातातून चक्क रक्त येऊ लागले

सॅम पित्रोदा यांनी सांगितली आठवण

अहो आश्चर्यच ! राजीव गांधी यांच्या हातातून चक्क रक्त येऊ लागले

राहुल गांधी ज्या प्रमाणे भारत जोडो यात्रा काढत आहेत, अशीच यात्रांची आवड हि त्यांचे वडील राजीव गांधी यांना होती. अमेठी मतदारसंघात एकदा त्यांनी अशी अशीच यात्रा काढली होती तेव्हा त्यांना मतदारसंघातील सुमारे पाच हजार गरीब कामगार लोक भेटले होते. त्यावेळी त्यांच्याशी ह्स्तालोंदन केल्यामुळे अक्षरश: राजीव गांधी यांच्या हातातून रक्तस्त्राव होत होता, अशी माहिती कॉंग्रेसचे ओव्हरसीज विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी एका यु ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

हेही वाचा..

अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले!

इस्रायलच्या हल्ल्यात तीन हिजबुल्लाह कमांडरचा मृत्यू

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

भेटणारे लोक हे मजुरी करत असल्यामुळे त्यांचे हात हे खडबडीत होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकाच वेळी भेटल्याने राजीव गांधी यांच्या हातातून रक्तस्त्राव झाला होता असे पित्रोदा म्हणाले. त्यांना त्यांच्या हातातून रक्त आले याची चिंता नव्हती मात्र त्यांना आपण गरीब लोकांना भेटलो याचा त्यांना आनंद होता. त्यांना भेटणे हे आपले कर्तव्य आणि आपले कामच आहे, असेही राजीव गांधी त्यावेळी म्हणाले होते.

१९८१, ८४, ८९ आणि ९१ मध्ये त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे सतीश शर्मा यांनी हा बालेकिल्ला ताब्यात घेतला होता. नंतर सोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. २००४, ०९ मध्ये राहुल गांधी हे विजयी झाले होते. मात्र दीर्घकाळ टिकलेला कॉंग्रेसचा बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाने हिसकावून घेतला आणि राहुल गांधी यांना वायनाडला जावे लागले, असेही पित्रोदा म्हणाले.

Exit mobile version