प्रभू राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर राम मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागत आहेत.तसेच भाविकांकडून मंदिराला दिलेल्या दान रकमेत भर पडत असून गेल्या २२ जानेवारीपासून कोट्यवधी रुपये गोळा झाले आहेत.हे पाहता पैशांच्या मतमोजणीसाठी हायटेक मशिन्स सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात देणगी आणि प्रसादाची सरासरी रक्कम सुमारे ४ कोटींवर पोहोचली असून रामनवमीपर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, भक्तांकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या मोजणीसाठी अलीकडेच स्टेट बँकेने नोटांचे वर्गीकरण आणि मोजणीसाठी मंदिर परिसरात दोन हाय-टेक स्वयंचलित पैसे मोजणी यंत्रे बसवली आहेत.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रसंगावधान; मुलीचे वाचवले प्राण!
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा ब्रेक के बाद
रेडिओचा आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन
बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!
देणगी स्वरूपात मिळालेल्या १० रुपये, २० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये आणि ५०० रुपयांच्या नोटा या मशीन्समध्ये टाकल्या जातात.हे मशीन सर्व प्रकारच्या नोटा वेगवेगळ्या करून १०० नोटांच्या बंडल स्वरूपात बाहेर पडतात.या अगोदर नोटांची मोजणी आणि वर्गीकरण करण्यासाठी जास्त वेळ लागत असे मात्र या मशिन्समुळे वेळेची बचत होत आहे.मशीन्समधून बाहेर पडलेले हे पैशांचे बंडल मंदिर ट्रस्टचे मोजणी प्रभारी पथक आणि बँक कर्मचारी
तपासतात, त्यानंतर ते बँकेत जमा केले जातात.
देणग्या आणि प्रसाद कोठे गोळा केला जातो?
मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात देणगी देण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी १० संगणकीकृत काउंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय रामलल्लासमोर ६ मोठ्या दानपेट्याही ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक आपली देणगी थेट दानपेटीत टाकतात. काउंटरवर देणगीसाठी संगणकीकृत पावत्या दिल्या जातात, असे मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.