ओडिशाच्या पुरी येथील राजभवनाच्या एका कर्मचाऱ्याने राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलावर मारहाणीचा आरोप केला आहे. राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलासह इतर पाच जणांनी ७ जुलैच्या रात्री हल्ला केला आणि आणि धमकी दिल्याचे कर्मचाऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, राजभवन, राज्यपाल आणि पोलिसांनी या कथित घटनेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
बैकुंठ प्रधान असे तक्रार दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बैकुंठ प्रधान हे राजभवनात असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) म्हणून कार्यरत आहेत. ८ जुलै रोजी दाखल केलेल्या औपचारिक तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ७ आणि ८ जुलै रोजीच्या पुरी राजभवनाच्या भेटीदरम्यान राज्यपालांचा मुलगा ललित कुमार याने क्रूरपणे मारहाण केली. ७ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजता हा कथित हल्ला झाल्याचे कर्मचाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये मोदी सरकारची मोठी खेळी; उप राज्यपालांकडे अधिक अधिकार
“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”
उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !
संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले
बैकुंठ प्रधान यांनी राज्यपालांचे मुख्य सचिव आकाश सिंह यांना उद्देशून केलेल्या तक्रारीनुसार, दासच्या वैयक्तिक शेफने सांगितले की ललित कुमार यांना भेटण्याची इच्छा आहे. यानंतर ललित कुमार यांची भेट घेण्यासाठी बैकुंठ प्रधान खोलीत पोहचताच. ललित कुमार याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर थप्पड, लाथ, ठोसे त्यांनी मारल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. हा संपूर्ण प्रकार ८ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत चालू होतो, असे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, कर्मचारी बैकुंठ प्रधान यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ॲनेक्सी रूममध्ये आश्रय घेतला, परंतु ललित कुमारच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने परत आणेल आणि धमकी देखील दिल्याचे म्हटले आहे.